[10/13, 4:49 PM] Glance it 🎯 _*‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू, नागरिकांचा होणार असा फायदा..!*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♟️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू केली. मोदी सरकार या कार्यक्रमात 107 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकार या योजनेद्वारे आर्थिक क्षेत्रासह कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देणार आहे.
🔖 *‘पीएम गति शक्ती’चे फायदे*
▪️ पायाभूत विकासातील अडथळे दूर होतील. लोकांचा प्रवासाचा वेळ वाचेल. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. व्यवसायात सुलभता येईल. पायाभूत प्रकल्प कमी खर्चात, नियोजित वेळेत होतील.
▪️ देशात दोन लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचे एकात्मिक जाळे तयार केले जाईल. रेल्वे व्यापारात अधिक सुविधांसाठी 1600 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळेल. 35,000 किमी गॅस पाईपलाईन केली जाईल.
▪️ भारतमाला, सागरमाला, बंदरे, उद्यान, आर्थिक क्षेत्र, रेल्वे यांसारख्या पायाभूत उपक्रमांचा योजनेत समावेश केला जाईल. पुढील टप्प्यात रुग्णालये, विद्यापीठांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण केले जाईल.
▪️ हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी 220 विमानतळे, एअरड्रोम आणि एअर स्ट्रिप्स एकत्र बांधली जातील. एकूण 25 हजार एकरांवर 11 औद्योगिक कॉरिडॉर उभारले जातील.
▪️ संरक्षण क्षेत्रात 1.7 लाख कोटी उत्पन्नाचे लक्ष्य आहे. देशात 38 इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर, 109 फार्मा क्लस्टर विकसित होतील. शिवाय 90 टेक्सटाईल क्लस्टर किंवा मेगा टेक्सटाईल पार्कचे लक्ष्य निश्चित केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[ _*📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा*_ 👉 *9700111511* ]
[10/13, 6:13 PM] spreadit: 📣 _*ब्रेकिंग : राज्यातील काॅलेज 20 ऑक्टाेबरपासून सुरु होणार, या नियमांचे पालन गरजेचे*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😷 कोरोनामुळे दीर्घ काळापासून बंद असलेली महाविद्यालये अखेर येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
🗣️ सामंत म्हणाले, की "महाविद्यालये सुरू करताना वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी नियमावली असेल. संबंधित जिल्ह्यातली परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेलं नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत."
💉 काॅलेज सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरणाने स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी विद्यापीठात वा काॅलेजच्या प्रांगणात कॅम्प घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
🏩 *वसतिगृहेही सुरु होणार*
कॉलेजमध्ये हजर राहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही, याचा अधिकार स्थानिक प्राधिकरणाला असेल. त्याचबरोबर आता टप्प्याटप्प्याने वसतिगृहेसुद्धा सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा