📣
▪️दहशतवादी संघटना अल कायदाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडविण्याची धमकी दिली. दिल्ली पोलिसांना अल कायदाच्या नावे ई-मेल. धमकी मिळताच दिल्लीत अलर्ट जारी. दिल्ली विमानतळावरही सुरक्षा वाढवली..
▪️मिल्खा सिंग यांचं स्वप्न साकार झालं, नीरज चोप्राच्या भावना, आपलं सुवर्ण पदक दिवंगत मिल्खासिंग यांना केलं समर्पित. ऑलिम्पिक पदक विजेत्यांना बीसीसीआय सन्मानित करणार, नीरज चोप्राला एक कोटी रुपये, तर इतरांनाही भरघोस बक्षिसं जाहीर..
▪️दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेच्या (एनआयए) जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी धाडी. एनआयएची सीआरपीएफ सोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये कारवाई.
▪️ठाण्यातील कळव्यात दरड कोसळून सहा घरांचं नुकसान, जीवितहानी नाही; 25 कुटुंबियांचं तातडीनं स्थलांतर. पोलीस अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.
▪️पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आता पासपोर्ट. देशभरात 424 पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्रे स्थापन. केंद्राजवळ राहणाऱ्या व्यक्ती पासपोर्टसाठी अर्ज दाखल करु शकतात.
▪️सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 ची पाचव्या सीरिजची विक्री 9 ऑगस्टपासून सुरू होणार. पाच दिवस ग्राहकांनी स्वस्तात सोनेखरेदीची संधी. 13 ऑगस्टपर्यंत मुदत..
▪️केंद्र सरकारच्या नवीन इलेक्ट्रिक विधेयकावर देशभरात चर्चा होतेय.. MSEB सारख्या ज्या राज्यांच्या संस्था आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी हे विधेयक धोक्याची घंटा.. खासदार संजय राऊत यांची टीका
▪️मुंबई विद्यापीठाचा आयडॉलच्या एमएचा निकाल जाहीर; आदेश बांदेकर, विवेक पंडित यांना प्रथम श्रेणी. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या परीक्षा.
▪️नगर-पुणे रस्त्यावरील गव्हाणेवाडी येथे नाकाबंदीदरम्यान कारमध्ये 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 550 किलो गो-मांस आढळले. पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल.
▪️जेम्स अॅंडरसनचा विश्वविक्रम, कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज, कुंबळेचाही विक्रम मोडला.. कसोटीत सर्वाधित विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप.
➖➖➖➖➖➖➖
🎯
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा